Ad will apear here
Next
पहिला अंतर्नाद पुरस्कार ज्येष्ठ तबलावादक राजू जावळकर यांना जाहीर
‘रंग ढोलकीचे’ कार्यक्रमात १६ नोव्हेंबर रोजी होणार पुरस्कार प्रदान
तबलावादक राजू जावळकरपुणे : ‘अंतर्नाद संस्थेच्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून विविध सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या वर्षीपासून संस्थेच्या वतीने दर वर्षी एका गुणवंत कलाकाराचा पुरस्कार देउन सन्मान करण्यात येणार असून, यंदाचा पहिला अंतर्नाद पुरस्कार ज्येष्ठ तबलावादक राजू जावळकर यांना प्रदान करण्यात येणार आहे,’ अशी माहिती अंतर्नाद संस्थेचे अमित गोखले यांनी दिली.

‘संगीतावरील प्रेमातून आम्ही या संस्थेची स्थापना केली. संगीतप्रेमींना वैविध्यपूर्ण कार्यक्रम देणे हा आमचा हेतू आहे. सहा वर्षांत आम्ही ८८ विविध प्रकारचे कार्यक्रम केले आहेत, यामध्ये फ्युजन, इंस्ट्रुमेंटल, भावगीत, दिवाळी पहाट अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. या कार्यक्रमांच्या तिकीटविक्रीतून जमा झालेल्या रकमेतून कार्यक्रमाचा खर्च वगळता जी रक्कम उरेल त्यातून आम्ही आजपर्यंत अनेक स्वयंसेवी संस्थांना मदत केली आहे. आम्ही नुकताच ‘रंग ढोलकीचे’ हा कार्यक्रम सादर केला आहे, या निमित्ताने दर वर्षी एका गुणवंत कलावंतास पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. यंदा पहिल्या पुरस्कारासाठी राजू जावळकर यांची निवड करण्यात आली आहे,’ असेही गोखले यांनी सांगितले.

‘पहिले पुरस्कारार्थी राजू जावळकर यांचे वडील अंकुश जावळकर हे तबलावादक होते, यामुळे तबलावादनाची आवड घरातूनच निर्माण झाली. राजू जावळकर यांनी वयाच्या आठव्या वर्षी तबलावादनाचे धडे उस्ताद गुलाम रसूल खाँ साहेब यांच्याकडे गिरवायला सुरुवात केली. त्याचकाळात ते आर्य भूषण थिएटर येथे तमाशामध्ये साथसंगतही करत असत. त्यानंतर वयाच्या १४ व्या वर्षी अरुण दाते यांच्या ‘शुक्रतारा’ कार्यक्रमातून व्यावसायिक तबलावादन सुरु केले, पुढे त्यांनी किशोरीताई अमोणकर, उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, रवींद्र साठे, वीणा सहस्त्रबुद्धे, सदाशिवराव जाधव, नंदकिशोर कपोते, आनंद मोडक अशा अनेक दिग्गज कलावंताना साथसंगत केली, तसेच अनेक मराठी चित्रपटांसाठीही  तबलावादन केले आहे. परदेशातही त्यांनी अनेक कार्यक्रम सादर केले आहेत. त्यांचे सांगीतिक योगदान लक्षात घेऊन त्यांची या  पुरस्कारासाठी निवड केली आहे. ५१ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराचे वितरण अंतर्नाद आयोजित ‘रंग ढोलकीचे’ या कार्यक्रमात ज्येष्ठ तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे यांच्या हस्ते होईल. १६ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता टिळक स्मारक मंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे,’ अशी माहिती अमित गोखले यांनी दिली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZWVCG
Similar Posts
ऋत्विक फाउंडेशनतर्फे रविवारी दोन सांगीतिक मैफली पुणे : ऋत्विक फाउंडेशनतर्फे रविवारी, १७ नोव्हेंबर रोजी ‘स्वर प्रभात’ व ‘मेलांज’ या दोन सांगीतिक मैफलींचे आयोजन करण्यात आले आहे. यात ज्येष्ठ बासरी वादक पं. हरीप्रसाद चौरसिया, ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. मुकुल शिवपुत्र, ज्येष्ठ सनई वादक पं. शैलेश भागवत, ज्येष्ठ तबला वादक पं. योगेश समसी, प्रसिद्ध कथक नृत्यांगना
कलाकार घडण्यासाठी हवा प्रत्यक्ष अनुभवच; तंत्रज्ञानाचा वापर कलात्मकता मारण्यासाठी नको पुणे : ‘हल्ली इंटरनेटवर कोणता विषय मिळत नाही असे नाही. त्यामुळे मुलांना एखादा विषय सांगितला की पालक लगेच मोबाइल, इंटरनेट वापरतात; मात्र कोणताही कलाकार घडायचा, घडवायचा असेल, तर मुलांना प्रत्यक्ष अनुभवच देणे आवश्यक असते. स्वतःच्या कल्पकतेने, सर्जनशीलतेतून आणि निरागसतेतून साकारलेली कलाच दीर्घ काळ टिकाव धरू शकते
पुण्यात उलगडतोय संगीत नाटकांचा सुवर्णकाळ; पहिल्या संगीत नाट्य-तंत्रज्ञ संमेलनाचे आयोजन पुणे : पुण्यातील भरत नाट्य संशोधन मंदिराला नुकतीच १२५ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने, चार नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत संस्थेत पहिले संगीत नाट्य-तंत्रज्ञ संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात मान्यवरांच्या मुलाखतींसोबतच संगीत नाटक महोत्सवही होणार आहे. तसेच १०० वर्षांतील संगीत नाटक कलावंतांच्या
‘राजसन्मान’ एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी २३-२४ नोव्हेंबरला पुणे : ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कोथरूड विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘राजसन्मान राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका’ स्पर्धेची प्राथमिक फेरी शनिवार, दि. २३ व रविवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी लोकायत सभागृह येथे सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत घेण्यात येणार आहे,’ अशी माहिती

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language